तासगाव शहरातील मुख्य बाजारपेठ होणार कंन्टेमेंट झोन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

तासगाव शहरातील बाजारपेठेचा बहुतांश भाग आता 28 दिवस बंद रहाणार आहे.

तासगाव : तालुक्‍यातील वाघापूर येथील एका 22 वर्षीय महिलेला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तत्पूर्वी तिच्यावर सावळज व तासगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तिच्या संपर्कातून तासगाव येथील 'त्या' हॉस्पिटलमधील ब्रदर व सिस्टरलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र सावळज व तासगाव येथील हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

तासगावातील मुख्य बाजारपेठ होणार कॅन्टोन्मेंट

पनवेलमधून आलेले 6 जण 23 मे रोजी आमणापूर येथे होम क्वारंटाईन झाले होते. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर 6 जणांपैकी वाघापूर येथे आलेल्या 22 वर्षीय एका महिलेला 
उपचारादरम्यान तिला कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने तिचा स्त्राव तपासण्यासाठी घेण्यात आला होता.

तपासणीनंतर तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.होता. ज्या हॉस्पिटलमध्ये ही महिला उपचार घेत होती त्या हॉस्पिटलमधील एक परिचारिका आणि एक परिचारक कोरोना बाधित झाल्याचे आज स्पष्ट झाले. 

कोरोना बाधित दोघे शहरातील ज्या भागात राहतात तो भाग आता कॅन्टोन्मेंट जाहीर होण्याच्या शक्‍यते मुळे शहरातील बाजारपेठेचा बहुतांश भाग आता 28 दिवस बंद रहाणार आहे. यापैकी एक जण जोशी गल्ली परिसरात तर दुसरा रुग्ण सोमवार पेठ परिसरात रहाण्यासाठी असल्याने हा भाग आता पूर्णपणे कॅन्टोन्मेंट परिसर होणार असल्याने मुख्य बाजारपेठच बंद रहाणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: main market will be the Contentment zone in Tasgaon city