
कोकरूड : टेम्पो आणि मोटार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत नऊ जण जखमी झाले. सर्व जखमींना कऱ्हाड व पुणे येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. हा अपघात कऱ्हाड- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शेडगेवाडी-कोकरूड मुख्य रस्त्यावर मोरेवाडी (ता. शिराळा) गावचे हद्दीत सोमवारी सकाळी ६ च्या सुमारास घडला. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.