
मिरज : मिरज एमआयडीसीत असलेल्या भंगाराच्या गोदामाला बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत प्लास्टिकचे साहित्य जळून खाक झाले. गोदामाबाहेर पेटवलेल्या कचऱ्याची ठिणगी पडून ही आग लागल्याचा अंदाज आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाने केलेल्या दीड तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. भर दुपारी उन्हाचा तडाखा असतानाच लागलेल्या आगीमुळे धुराचे लोट परिसरात पसरले होते.