प्रत्यक्ष पंचनामे करा, नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करा 

बादल सर्जे 
Saturday, 17 October 2020

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पंचनामे करा. नुकसानीचा एकत्रित अहवाल तातडीने राज्य शासनाला सादर करण्यात यावा, असे आदेश राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. 

जत  : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पंचनामे करा. नुकसानीचा एकत्रित अहवाल तातडीने राज्य शासनाला सादर करण्यात यावा, असे आदेश राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. 

जत तालुक्‍यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तर पंचायत समिती येथे कोरोना, कृषीसह इतर विषयासंदर्भात आढावा घेतला. यावेळी आ. विक्रमसिंह सावंत, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसिलदार सचिन पाटील, पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले, बीडिओ अरविंद धरनगुत्तीकर, आदीसह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

विश्वजीत कदम म्हणाले, तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. ती कमीच रहावी, यासाठी शासनाची "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" ही मोहीम चांगली राबवा. एकही घर वंचित राहणार नाही, याची काळजी घ्या. असे आदेश दिले. यावर गोंधळेवाडी गावात एकही सर्वेक्षण झाले नसून ग्रामस्थांनी विरोध केला आहे. असे जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी निदर्शनास आले. यावर राज्यमंत्र्यांनी सहकार्य करत नसेल त्याठिकाणी कारवाई करा, अशा सूचना दिल्या.यावेळी अजिंक्‍यविद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर जाधव मिरज तालुका लहान असून 16 वेदर स्टेशन आहे. मात्र, विस्ताराने मोठा असलेल्या जत तालुक्‍यात आठच आहेत. त्यात वाढ व्हावी, अशी मागणी केली. याबाबत विचार करून लवकरच वेदर स्टेशन उपलब्ध करण्यासाठी तरतूद करू असे डॉ. कदम यांनी सांगितले. 

सहनिबंकांवर निलंबनाचे आदेश.... 
सहायक निबंधक ए. एम. यशवंत हे महिन्यात कार्यालयात हजर राहतात. लोकांच्या अडचणी आहेत. बॅंका शेतकऱ्यांना कर्ज नाकारते, अशा अनेक तक्रारी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार व सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केल्या. त्यावर राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी वरिष्ठांना फोनवरुन सहायक निबंधक यशवंत यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make direct inquiries, submit loss report immediately