'त्या' 49 लाखांची स्वतंत्र चौकशी करा; कुणी केली मागणी वाचा

Make an independent inquiry of 49 lakhs taken by President & Speaker
Make an independent inquiry of 49 lakhs taken by President & Speaker

सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींनी सदस्यांना अंधारात ठेवून पळवलेल्या 49 लाख रुपयांच्या निधीची स्वतंत्रपणे चौकशी करावी. हा निधी कोणत्या कारणासाठी खर्च झाला, याचा हिशेब सभागृहात सादर केला जावा, अशी मागणी कॉंग्रेसचे सदस्य जितेंद्र पाटील यांनी आज मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे केली. 

अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींनी त्यांच्या गटातील केवळ 20 गावांत 49 लाखांचा निधी पळवला आहे. अन्य सदस्यांना अडीच लाखांचा निधी मिळाला. पदाधिकाऱ्यांनाही तो मिळाला. त्याशिवायचा, हा स्विय निधी पळवण्यात आल्याचा आरोप श्री. पाटील यांनी काल केला होता. त्याच्या चौकशीसाठी आज त्यांनी श्री. गुडेवार यांनी पत्रव्यवहार केला.

कोरोना आपत्ती काळात वापरण्यासाठी हा निधी उपयोगात यायला हवा, हे वास्त आहे. पण, जिल्ह्यातील केवळ वीस गावांतच कोरोना आहे का? त्या गावांमध्ये त्याची दाहकता अधिक आहे का? मग या गावांनी निधी कसा खर्च केला, काय खरेदी केले, ग्रामपंचायतींनी आधीच सॅनिटायझर आणि मास्क खरेदी केली असेल तर मग या निधीतून कोरोना आपत्ती विरोधात लढायला काय उपयोग झाला, याची माहिती सभागृहासमोर यायला हवी. त्यासाठी त्याची गावनिहाय चौकशी व्हावी, अशी मागणी श्री. पाटील यांनी केली. 

दरम्यान, या निधीतून पेडसाठी दिलेली 2 लाख 99 हजारांची रक्कम समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांनी परत मागवली. हा निधी तेथे खर्च न करता अन्य चांगल्या कामासाठी वळवण्याबाबत त्यांनी विचार केला आहे. भविष्यात स्विय निधीच उपलब्ध होणार नसेल तर हा उपलब्ध निधी योग्य कारणासाठी वापरला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com