अल्पवयीन मुलाच्या खूनाबद्दल कवलापूरमधील एकास जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

सांगली ः अल्पवयीन मुलाचा खून करून शिराळा येथील मोरणा नदीत मृतदेह टाकल्याप्रकरणी कवलापूर (ता. मिरज) येथील अरुण शिवाजी माळी (वय 33) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी निकाल दिला. सरकार पक्षातर्फे मकरंद ग्रामोपाध्ये यांनी काम पाहिले. 

याबाबतची माहिती अशी, की अरुण माळी याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. ही बाब करण अनिल खेडकर या मुलाला माहित होती. अनैतिक संबंध तो उघडकीस आणेल या भीतीने अरुणने करणला कॉलेजमधून गोड बोलून गावातील तालिमीत आणले. तिथे करणच्या डोक्‍यात काठीने वार केला. तो कोसळताच त्याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह, कॉलेजचे दप्तर एका पोत्यात भरून चारचाकीतून शिराळा येथे आणले. तेथे मोरणा नदीत मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, करण कॉलेजमधून परत न आल्याने कुटूंबियांनी सांगली ग्रामीण पोलिसांत तो हरवल्याची तक्रार दिली. तपास करीत असताना पोलिसांना शिराळा येथे नदीपात्रात मृतदेह मिळून आला. संबंधित महिलेकडील चौकशीत अरुण माळीने खून केल्याचे निष्पन्न झाले. तो पळून जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. 

खटल्यात न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल, पंच व साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून आरोपी अरुण माळी याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. संजयनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ए. व्ही. शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man sentenced to life imprisonment for murder of a minor