
मोहोळ : सोशल मिडीयावर एक व्हिडीओ आला होता. सदर व्हिडीओ मध्ये एक इसम हातात पिस्टल घेवून उभा असल्याचे दिसत असून तो सोबतच्या लोकांना त्याच्याजवळील पिस्टल लोड असल्याचे सांगत आहे. त्याचे आजूबाजूचे लोक त्याचेशी बोलत असताना तो त्याचेकडील पिस्टल त्यांचे दिशेने रोखून दहशत पसरवित असताना दिसत असून पिस्टल मधून दोन राउंड हवेमध्ये फायर केल्याचे दिसत होता.