तांबवेतील मंडळे यंदा करणार नाहीत सार्वजनिक गणेशोत्सव

विजय लोहार
Sunday, 9 August 2020

तांबवे (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे

नेर्ले : तांबवे (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाला गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ग्राम प्रशासन व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या निर्णयाचे तालुक्‍यात कौतुक होत आहे. यामुळे संसर्ग टळण्यास मदत मिळणार आहे. 
महामार्गापासून काही अंतरावर व कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं तांबवे हे गाव. ग्रामपंचायत ने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनास सहकार्य म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणपती न बसवण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील 21 मंडळांनी हा निर्णय घेतला. 

युवकांच्या ग्रामपंचायत च्या सरपंच सुषमा भंडारी, पोलीस पाटील संताजी कोळी, उपसरपंच अवधुत पाटील, ग्रामपंचायत सदस्य विक्रम चव्हाण, गिरीश जाधव, रोहित पाटील, तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी याबाबत कासेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना निवेदन दिले.

ग्रामप्रशासनाच्या या निर्णयाला सगळ्या युवक मंडळांनी पाठिंबा दिला. गावातील पैसे वाचणार आहेत. संसर्ग रोखण्यास मदत, तसेच सहकार्याची भावना वाढणार आहे. सर्व मंडळाचे आभार मानण्यात आले. स्वागत शिवाजी पाटील यांनी केले. राहुल मोरे, अमर इनामदार, प्रवीण पाटील, अंकुश चव्हाण, अविनाश बल्लाळ, दीपक पाटील यांच्यासह गणेश मंडळांचे युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. 

कासेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तांबवे गावाने सार्वजनिक गणेशोत्सव यंदा न करण्याचा घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. त्यांच्या निर्णयाचा आदर्श इतर गावांनी देखील घ्यावा. तसे ठराव करावेत, युवकांनी उत्स्फूर्तपणे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव टाळावा. 
- सोमनाथ वाघ, सहायक पोलिस निरीक्षक, कासेगाव पोलिस ठाणे 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandals in Tambwe will not hold public Ganeshotsav this year