मंगळवेढा - आदीवासी कोळी समाजाचा मोर्चा

हुकूम मुलाणी
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मंगळवेढा - आरक्षणाच्या मुद्दयावरून मराठा, धनगर, मुस्लिम समाज आंदोलन करत असताना यात आदीवासी कोळी समाजानेही उडी मंगळवेढा सोलापूर रोडवरीव टोल नाका येथे कुराड मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केले.

मंगळवेढा - आरक्षणाच्या मुद्दयावरून मराठा, धनगर, मुस्लिम समाज आंदोलन करत असताना यात आदीवासी कोळी समाजानेही उडी मंगळवेढा सोलापूर रोडवरीव टोल नाका येथे कुराड मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केले.

यात समस्त आदिवासी महिला आणि लहान मुले देखील सहभागी झाली. जातप्रमाण पत्र अवैध झाल्या कारणाने कामावरून कमी केलेल्या समाज बांधवाना कामावर घेणे, बोगस कामे करत असलेली जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बरखास्त करणे, स्वतंत्र जात पडताळणी खाते निर्माण करणे, 1950 पुर्वीची जातीच्या पुराव्याची अट रद्द करूनही जातीचा दाखला न देणाऱ्या अधीकार्याची चौकशी करणे, रक्त नातेवाईकांना जातीचा दाखला दिला असल्यास कुटुंबातील इतरांना जातीचा दाखला देणे या व अशा इतर महत्वाच्या मागण्यासाठी आदिवासी कोळी समाजाने आपला शासनावरिल राग व्यक्त करत हे आंदोलन केले. प्रदेशाअध्यक्ष राजेंद्र कोळी यानी चार वर्षा पूर्वी आझाद मैदानावरिल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाचा आज त्यांनाच विसर पडला आहे वेळोवेळी आंदोलने करून व निवेदने देवुनही शासन आमच्या मागण्या विचारत घेत नाही. याचा पुढील काळात दर 15- 20 दिवसांनी मोठ्या स्वरूपात रास्ता रोको आंदोलन करण्याचा संकल्प आदिवासी दिनी करत असल्याचे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष युवराज कोळी, मल्लेशि कोळी, विजय कोळी, महालिंग कोळी, बाबासाहेब कोळी, लक्ष्मण कोळी सलगर, पांडुरंग कोळी, भीमा कोळी सिद्धापूर, कृष्णा घाटे भोसे, विठ्ठल कोळी, आदित्य राऊत, दिग्विजय कोळी, नितीन कोळी, बिरु कोळी, दत्ता कांबळे, मल्लू घंटे, कैलास कोळी, लक्ष्मी कोळी, भाग्यश्रि राऊत, सुनंदा कोळी, छाया कोळी, सुधाताई कोळी मोहोळ यासोबतच चर्मकार समाज, मातंग समाज, सकल मराठा समाज, मुस्लिम समाज, धनगर समाज, लिंगायत समाजाने कोळी समाजाच्या या आंदोलनास पाठींबा दिला. तहसीलदार समिंदर साहेब यांनी आंदोलनाचे निवेदन स्वीकारले. यावेळी पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangalveda - tribal Koli community morcha