esakal | आंबा सामान्यांच्या आवाक्‍याबाहेरच; डझनाचा दर 450 ते 950 रुपये

बोलून बातमी शोधा

फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा बाजारात सर्वत्र दिसू लागला आहे. परंतु दर आवाक्‍याबाहेरच असल्याचे चित्र आहे.

फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा बाजारात सर्वत्र दिसू लागला आहे. परंतु दर आवाक्‍याबाहेरच असल्याचे चित्र आहे.

आंबा सामान्यांच्या आवाक्‍याबाहेरच; डझनाचा दर 450 ते 950 रुपये
sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा बाजारात सर्वत्र दिसू लागला आहे. परंतु दर आवाक्‍याबाहेरच असल्याचे चित्र आहे. विष्णूअण्णा फळ मार्केटमधील आंब्याचा एक डझन बॉक्‍सचा दर 450 ते 950 रुपये इतका आहे. यंदा आंब्याचा हंगाम थोडे दिवस अगोदरच सुरू झाला आहे. पाडव्यानंतर आवक वाढेल. त्यानंतर दर आवाक्‍यात येतील. 

द्राक्षाप्रमाणेच यंदा आंबा देखील जवळपास महिनाभर अगोदर बाजारात आला आहे. परंतु दर जास्त असल्यामुळे अपवाद वगळता इतर ग्राहकांनी खरेदीसाठी उत्साह दाखवला नाही. परंतु आता फळ मार्केटबरोबरच बाजारात सर्वत्र आंबा दिसू लागला आहे. परंतु ग्राहक चौकशी करून पुढे जात आहेत असे दिसते. परंतु पाडवा जवळ आल्यामुळे बाजारात अनेक ठिकाणी आंबा दाखल झाला आहे. आंब्याचा खरा हंगाम पाडव्यानंतरच सुरू होतो. त्यामुळे हळूहळू आवक वाढेल. 


येथील विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये आंबा आवक होते. सध्या देवगड, रत्नागिरी येथील हापूस आंबा विक्रीसाठी येत आहे. तसेच कर्नाटकातील हापूसही दाखल झाला आहे. कर्नाटक हापूसचा दर 450 रुपये डझन असा आहे. तर देवगड, रत्नागिरी हापूस दर 950 रुपये डझनपर्यंत आहे. मंगळवारी पाडवा असल्यामुळे अनेकजण आंबा खरेदी करतात. त्यामुळे आवकही वाढली आहे. आज फळ मार्केटमध्ये 6 हजार बॉक्‍सची आवक झाली होती. 


आजच्या सौद्यातील दर 450 ते 950 रुपये डझन इतका होता. दर अद्यापही जास्त असल्यामुळे आंबा सामान्यांच्या आवाक्‍याबाहेरच आहे. गतवर्षी आंब्याच्या हंगामावर कोरोनाचे सावट होते. यंदाही तीच परिस्थिती आहे. ग्राहकांना आंब्याचे दर उतरण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. पाडव्यानंतर आवक जास्त आणि दर आवाक्‍यात येईल अशी परिस्थिती आहे.

संपादन : युवराज यादव