esakal | आंब्याचा बॉक्‍स फक्‍त देवगड हापूसचा  
sakal

बोलून बातमी शोधा

Mango local Karnataka mangoes Devgad Hapus.

लॉकडाऊनचे नियम अंशत: शिथिल झाल्याने आंबा खरेदीचे प्रमाण वाढले आहे. मात्र देवगड हापूसच्या नावाखाली स्थानिक कर्नाटकी आंब्याची विक्री होत असल्याने आंबाप्रेमींची फसवणूक होत आहे.

आंब्याचा बॉक्‍स फक्‍त देवगड हापूसचा  

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगाव: उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की, अनेकांना हापूस आंबा खाण्याचे वेध लागतात. सगळ्या आंब्यामध्ये हापूसची चव निराळीच असल्याने अनेकजण हापूसलाच प्राधान्य देतात. रत्नागिरी, देवगडी हापूस आंबा जगप्रसिद्ध असल्याने व शहरात लॉकडाऊनचे नियम अंशत: शिथिल झाल्याने आंबा खरेदीचे प्रमाण वाढले आहे. मात्र देवगड हापूसच्या नावाखाली स्थानिक कर्नाटकी आंब्याची विक्री होत असल्याने आंबाप्रेमींची फसवणूक होत आहे. हापूस आंबा नेमका ओळखायचा कसा याची माहिती नसल्याने अनेकजणांची फसवणूक होत आहे. 

सध्या आंबा बाजारात बॉक्‍स देवगडी हापूसचा ठेऊन याच बॉक्‍समधून पायरी आंब्याचीही विक्री केली जात आहे. यामुळे आंबा ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. सौंदत्ती, रामदूर्ग आणि शहरातील झोपडपट्टी परिसरातील नागरिक रस्त्यावर आंब्याची विक्री करत आहेत. त्यांच्याकडून स्थानिक आंबे खरेदी करून त्याची रस्त्यावर विक्री केली जात आहे. देवगडमधून बेळगावमध्ये हापूस आल्यानंतर त्याची विक्री होते. यावेळी ग्राहक बॉक्‍सऐवजी पिशवीमधूनच आंबा खरेदी करतात. यावेळी आंब्याचे रिकामे बॉक्‍स रस्त्यावरील विक्रेते घेतात, त्यानंतर त्याच बॉक्‍समधून स्थानिक आंबा देवगडी आंबा म्हणून विक्री केली जाते. तर काही विक्रेत्यांनी देवगडी हाफूस आंब्याचे बॉक्‍स प्रिंट करुन घेऊन त्यातून स्थानिक आंब्यांची विक्री केली जात आहे. 
 

loading image