

Social Reforms: MAnis Announces State-Level Awards for Dedicated Rationalist Activists
Sakal
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा झाली असून अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रल्हाद बोराडे (जामनेर, जळगाव) यांना महा. अंनिस समर्पित ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार, महा. अंनिस कृतिशील आदर्श शिक्षक पुरस्कार धर्मराज चवरे (मोहोळ, सोलापूर), महा अंनिस कृतिशील महिला कार्यकर्ती पुरस्कार ॲड मनिषा महाजन (आकुर्डी, पुणे) तर महा अंनिस मधुरजग युवा प्रेरणा पुरस्कार सांगलीच्या अजय भालकर (इस्लामपूर, सांगली) यांना देण्यात येणार असल्याची माहिती महा अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी दिली.