राष्ट्रवादीचे शिराळ्याचे आमदार म्हणाले मी यांच्यासोबत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

शिराळा ( सांगली ) - राज्यातील सत्ता स्थापनेच्या नाट्यमय घडामोडीचे पडसाद ग्रामीण भागात उमटू लागल्याने शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांचा पाठिंबा कोणाला या चर्चा आता सत्ता स्थापने एवढ्याच शिराळा मतदार संघात रंगू लागल्या आहेत.

नाईक घराणे आणि शरद पवार यांचे जुने राजकीय संबंध आहेत. शरद पवार व अजित पवार  यांची मानसिंगराव नाईक यांच्यावर विशेष मर्जी आहे. २००९ ला उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी शिराळ्यासाठी भरीव निधी दिला त्यासाठी त्यांना तत्कालीन ग्रामविकासमंत्री जयंतराव पाटील यांची मोलाची साथ मिळाली. शरद पवार, अजित पवार व जयंत पाटील हेच मानसिंगराव नाईक यांचे नेते आहेत. महाशिवआघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापनेच्या तयारीत असलेल्या शरद पवार यांना त्यांच्याच पुतण्याने डावलून भाजपच्या सरकारला पाठिंबा देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र त्यांना आता बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे कोणते आमदार अजित पवार यांच्या पाठीशी आहेत याची उत्सुकता लागली आहे.

या संदर्भात आमदार मानसिंगराव नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सोबत आहेत. जयंत पाटील असतील तिथे मी असेन.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mansinghrao Naik Says I Am With Jayant Patil