ऊस तोडणी कामगारांच्या सुरक्षेसह हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखानदार प्रयत्नशील 

शामराव गावडे
Tuesday, 8 September 2020

मागील हंगामाच्या शेवटी कोरोनाची सुरवात झाली होती. त्यावेळी तोडणी यंत्रणा थांबली नाही

नवेखेड (जि. सांगली) : यंदाच्या चालू गळीत हंगामात जिल्ह्यात १२ साखर कारखाने सुरू राहणार आहेत. त्यासाठी एक लाख पंधरा हजार हेकटर उसाची तोडणीसाठी नोंद झाली आहे. या कारखान्यांमधून ८१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होणार आहे.

मागील हंगामाच्या शेवटी कोरोनाची सुरवात झाली होती. त्यावेळी तोडणी यंत्रणा थांबली नाही, परिणामी यंत्राने ऊस तोडणी करावी लागली तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना तोडणी मजुरांना ऊस तोडणीसाठी पैसे मोजावे लागले होते. 

ऑक्टोबर महिना उजाडला की जिल्ह्यातील साखर कारखान्यांना गाळप हंगामाचे वेध लागतात. साधारणपणे ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या सुरवातीला हा हंगाम सुरू होईल. कोरोनाची भीती असली तरी तोडणी कामगारांची सर्व सुरक्षा घेत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना व्यवस्थापन दक्ष आहे. मजुरांची तपासणी करण्यासाठी कारखाने स्वतंत्र यंत्रणा राबविणार आहेत. या सर्वांवर मात करत कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापन दक्ष आहे.

जिल्ह्यातील 12 साखर कारखान्याची नोंद उसाची माहिती हेकटर, व उत्पादनाची माहिती मेट्रिक टनमध्ये.

१)हुतात्मा वाळवा ७३८९ हेकटर, गाळप७२०००० मेट्रिक टन
२) राजारामबापू साखराळे ,११३४६,११ लाख
३)राजारामबापू वाटेगाव ६०१८,साडेपाच लाख टन
४)सर्वोदय कारांदवाडी ४५७०,सव्वाचार लाख टन
५)मोहनराव शिंदे ८३४०.६६,पाचलाख टन
६)विश्वास चिखली ९४०५,साडेसहा लाख
७)क्रांती कुंडल ११११३,नऊलाख टन
८)सद्गुरू राजेवाडी १३९६०,११ लाख ८०हजार टन
९)सोनहीरा वांगी १२२४४ ,साडे नऊ लाख
१०)दत्त इडिया  १२५००,दहा लाख टन
११) उदगिरी शुगर ११५००,पाच लाख टन
१२)निनाई देवी दालमिया ६५००,तीन लाख साठ हजार
कोट

 १५ ऑक्टोबर पासून तोडणी मजूर येण्यासाठी सुरवात होईल ते आले की कारखान्याचा आरोग्य विभाग व कृष्णां हॉस्पिटल कराड यांच्या मार्फत प्रत्येक मजुरांची रॅपिड अटीजन टेस्ट केली जाईल.एखाद्याला त्रास झाला तर त्याच्यावर कोविड प्रतिबंधक उपयोजना केली जाईल.
 -पी. आर. पाटील, अध्यक्ष राजारामबापू साखर कारखाना

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manufacturers strive to make the season a success with the safety of cane harvesting workers