वर्क फॉर्म होम करीत अनेकजण शिकले स्वयंपाक 

दिलीप क्षीरसागर 
Saturday, 11 July 2020

कामेरी (सांगली) ः कोरणाच्या पार्श्वभूमीवर घरात लॉकडाऊन असणारे पतिराज स्वयंपाकात झाले तरबेज... पत्नीला घरकामात पतीची मदत मिळालेने ती ही झाली खुष... कोरोणाने सर्वत्र हाहांकार माजवला या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले.

शासकीय व निमशासकीय अनेक नोकरदार मंडळीना वर्क फॉर्म होम करण्याची मुभा ही देण्यात आली. जवळजवळ चार महिने घरात थांबलेल्या या मंडळींनी होमवर्क करत आपली नोकरी सांभाळत पत्नीला स्वयंपाकात मदत केली. 

देशात सर्वत्र कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. यामध्ये अनेक कंपन्यांनी आपले कर्मचाऱ्यांना वर्क फॉम होम करण्यास सांगितले होते. या काळात 
हॉटेल बंद असल्याने नाश्‍ता, जेवण, वेगवेगळ्या रसोयीचा आस्वाद आपल्या कुटुंबातील मुलेबाळे यांच्यासह घेतला.

मात्र हे पदार्थ बनवत असताना पतीने आपल्या पत्नीला स्वयंपाकात केलेल्या मदतीने पत्नीचे चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहावयास मिळाला. आणि पुरुष मंडळीही चहा, नाश्‍ता, स्वयंपाक करायला शिकली तर हॉटेलचे पदार्थ, जेवण, खाणाऱ्या खवय्यांना घरातच अनेक चविष्ट पदार्थ मिळू लागल्याने अनेकांनी हॉटेलकडे फिरवली आता पाठ. 

संपादन ः अमोल गुरव 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many learned cooking by doing work form home