Vidhan Sabha 2019 : 'उज्ज्वला'मुळे महिलांना चुलीपासून मिळाली मुक्ती : चित्रा वाघ

हुकूम मुलाणी 
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

 उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून चुल मुक्त व धूर मुक्त योजनेचा मिळाला महिलांना लाभ. 

मंगळवेढा : चुलीतील धुरामुळे महिलांच्या डोळ्याच्या आजाराचा विचार करून उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून चुल मुक्त व धूर मुक्त योजनेचा लाभ मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी ठरले असल्याचे प्रतिपादन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.

भाजप-शिवसेना-रिपाइं-महासंग्राम मित्रपक्षाचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचाराच्या निमित्ताने येथील श्रीराम मंगल कार्यालयात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये त्या बोलत होत्या. शहरातील प्रमुख चौकातून महिलांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली. यावेळी व्यासपीठावर खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, लक्ष्मणराव ढोबळे जिल्हा प्रभारी अविनाश कोळी नगरसेवक अजित जगताप गौरीशंकर बुरकुल सीमाताई परिचारक कोमल ढोबळे अश्विनी शहा वैशाली सातपुते रजनीताई देशमुख ज्योती चव्हाण अंजली मोरे शितल बुरकुल सविता स्वामी आदीसह महिला मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होत्या.

चित्रा वाघ म्हणाल्या, की यापूर्वीच्या काळात आरक्षित जागेवर आपला हक्क मिळविण्यासाठी देखील भांडावे लागत होते. परंतु पंतप्रधान मोदी यांनी गोरगरिबांना लाभ मिळावा, म्हणून श्रीमंताला गॅसची सबसिडी सोडण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कायदा न करता विनंती केल्यामुळे केवळ 1 कोटी 25 लाख लोकांनी गॅसची सबसिडी सोडल्यामुळे त्याचा लाभ तर वंचित गोरगरिबांना मिळवून दिला, असा कायदा यापूर्वी लालबहादूर शास्त्री यांनी केला. त्यानंतर प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहेत. कोणत्याही योजनेला महिलेस महिला सक्षमीकरण व सशक्तीकरण असे नाव न देता प्रत्यक्ष महिलांच्या हिताचा विचार करून ग्रामीण भागात शौचालयाच्या कामात उद्दिष्टपूर्ती करून दाखवण्यात त्यांनी यश मिळवले.

अलीकडच्या काळात महिलांच्या सर्वेक्षणात शंभर महिलामागे आठ महिलांना स्तनाचा कॅन्सर झाल्याचे आढळून. त्यासाठी त्यांनी महिलांच्या आरोग्याचा विचार करून त्यांनी आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून कमी खर्चात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या भाजपने मला दिलेल्या संधीचा माध्यमातून मंगळवेढ्यातील महिलांना शाश्वत रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करताना पंढरपुरातील सुधाकर पंथाच्या कामाच्या विकासकामाचा डोंगर कोणी विसरू शकत नाही.

प्रास्ताविकात नगरसेवक अजित जगताप म्हणाले, की शासनाने नगरपालिकेच्या माध्यमातून महिलांच्या विकासासाठी 22 कोटींचा निधी दिल्याने हा निधी महिलांच्या बचत गट, स्वयंरोजगार, गॅस ,घरकुल, वैद्यकीय सुविधेसाठी सत्कारणी लावणार लावण्यात आला असल्याचे ते म्हणाले. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे अविनाश कोळी कोमल ढोबळे वैशाली सातपुते यांची भाषणे झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many Women benefited due to Ujjwala Yojana says Chitra Wagh