मराठा आरक्षण हे सामुदायिक यश आहे : चंद्रकांत घुले

हुकूम मुलाणी
रविवार, 2 डिसेंबर 2018

मंगळवेढा : ''116 वर्षापूर्वीपासून राजर्षी शाहू महाराजांनी मराठा आरक्षणाबाबत प्रयत्न केले होते. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील, शशिकांत पवार, पुरुषोत्तम खेडेकर हे देखील 1984 पासून पाठपुरावा करीत आहेत. लाखोंचे 58 मोर्चे महाराष्ट्रात निघाले 42 मराठा बांधवांनी बलिदान दिल्याने न्याय मागणीचा लढा यशस्वी केला असून मराठा आरक्षण हे सामुदायिक यश आहे.'' , असे मत मंगळवेढा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांनी व्यक्त केले.
 
 उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले म्हणाले की, ''दिर्घकाळापासून पिढ्यानपिढ्या बहुसंख्य मराठा समाज दारिद्र्यात खितपत पडलेला आहे. मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणात आकडेवारी प्रसिद्ध झाली ती फार विदारक आहे. आर्थिक परिस्थिती गरिबीची त्यामुळे शिक्षण नाही, नोकरी नाही, धंदा नाही. यामुळे असंख्य मराठा कुटुंबाची जगणे अवघड झाले होते. मराठा बंधू-भगिनींनी आबालवृद्धांनी उभारलेल्या या लढ्याला यश आले आणि एवढ्यावर लढाई संपलेली नाही. कदाचित न्यायालयीन लढाई पुढे आली तर,जिद्दीने लढावी लागेल.

जिल्हयात आंदोलने, मोर्च्यासाठी अनेकांनी योगदान दिले. अनेक तरुणांनी आपल्यावर किती गुन्हे दाखल होतील याची पर्वा न करता आरक्षणाबाबत काम केले आहे. गेल्या चार वर्षात अनेक लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणाबाबत आग्रही भूमिका मांडत सरकारला धारेवर धरले होते. भाजप-सेना युतीचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने हे आरक्षणाचा ठराव मंजूर केला होता. हे सगळे समस्त महाराष्ट्रातील जनतेचे सामुदायिक यश आहे. मात्र काही जणांना याचे श्रेय घेण्याची गडबड झाली. मात्र, सरकारच्या त्या निर्णयाचा कुणी स्वतःच्या स्वार्थासाठी फलक लावून फायदा घेत असेल तर ते गैर आहे. मंगळवेढा  शहरात लावलेल्या फलकावर बलिदान देणाऱ्या समाज बांधवांचा साधा ही उल्लेख केला नाही.'' ही खेदाची बाब असल्याचे उपनगराध्यक्ष घुले म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha reservation is a collective achievement: Chandrakant Ghule