राज्यव्यापी बंदला पाठिंबा, पण बार्शीत बंद नाही

सुदर्शन हांडे
मंगळवार, 24 जुलै 2018

बार्शी हे दुवादाशी क्षेत्र आहे, बारस क्षेत्र आहे, पंढरपूर येथील वारी संपवून मराठवाडा विदर्भासह महाराष्ट्रातील हजारो भक्त बार्शी येथे असलेले जगातील एकमेव श्री भगवंत मंदिरात भाविक येत असल्याने, बार्शी सकल मराठा समाज राज्यव्यापी बंदला पाठिंबा देत असला तरी बार्शी येथे बंद पाळण्यात येणार नाही

बार्शी : मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलन व वेगवेगळ्या आंदोलना वेळी गंगाखेड तालुक्यातील काकासाहेब शिंदे-पाटील या युवकाने गोदावरी नदीत उडी मारून प्राण अर्पण केल्या नंतर मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. 

बार्शी हे दुवादाशी क्षेत्र आहे, बारस क्षेत्र आहे, पंढरपूर येथील वारी संपवून मराठवाडा विदर्भासह महाराष्ट्रातील हजारो भक्त बार्शी येथे असलेले जगातील एकमेव श्री भगवंत मंदिरात भाविक येत असल्याने, बार्शी सकल मराठा समाज राज्यव्यापी बंदला पाठिंबा देत असला तरी बार्शी येथे बंद पाळण्यात येणार नाही, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने आण्णासाहेब शिंदे यांनी केले आहे.

Web Title: MarathaKrantiMorcha bandh in Barshi