''विकिपीडिया'वर मराठी लेखन एक टक्का' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''विकिपीडिया'वर मराठी लेखन एक टक्का'

''विकिपीडिया'वर मराठी लेखन एक टक्का'

सांगली : विकिपीडियावर जगभरातील 294 भाषा आहेत. मराठी लेखन करणाऱ्यांची संख्या एक टक्का आहे. टेक्‍नोसॅव्ही युगात मराठीला प्रगल्भ करण्याची जबाबदारी तरुणाईची आहे, असे मत राज्य मराठी विकास संस्थेचे मार्गदर्शन सुबोध कुलकर्णी यांनी येथे केले. 

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विलिंग्डन महाविद्यालयात 'विकिपीडिया' वर कार्यशाळा झाली. त्यात विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर अध्यक्षस्थानी होते. मराठी विभागप्रमुख प्रा. वि. दा. वासमकर, श्रीनिवास कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. कुलकर्णी म्हणाले, ''आजची तरुणाई फेसबुक, व्हॉटस्‌ऍप सारख्या सोशल मीडियावर भन्नाट लेखन करते आहे. मात्र तिथले लेखन चिरकाळ टिकत नाही. त्याची काही दिवसात 'ई-रद्दी' च होते. तुमचे विचार चिरकाल टिकवण्यासाठी 'विकिपीडिया' ने व्यासपीठ दिले. तंत्रज्ञानाचे झपाट्याने बदल होताहेत. एका क्‍लिकवर जगभरातील माहिती उपलब्ध होतील. त्यामुळे जग तळहातावर आले आहे. यात 'विकिपीडिया' सारख माध्यम विचारांना मोफत व्यासपीठ उपलब्ध करून देते आहे. ज्ञानाचा सारांश इतरांसाठी दिला जातो. पण, अशा माध्यमांकडे टेक्‍नोसॅव्ही विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. विकिपीडियाचे माध्यम सर्वांसाठी मोफत आहे. तब्बल 294 प्रकारच्या भाषा त्यावर आहे. विद्यार्थ्यांनी मुक्तपणे लेखन करावे. त्याचा आधार किंवा प्रोत्साहन इतरांना मिळू शकते.'' 

श्री. कुलकर्णी यांनी चित्रफितीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर इच्छुक विद्यार्थ्यांचे 'विकिपीडिया' अकौंटही काढून दिले. असे नावीन्यपूर्ण उपक्रम महाविद्यालयात वारंवार व्हावेत, अशी अपेक्षाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. प्रा. मनोहर कोरे यांनी आभार मानले. 

अकाऊंट कसे काढाल...

  • https://mr.wikipedia.org/ संकेतस्थळ उघडा 
  • मुखपृष्ठावर नवीन खाते पर्यायावर क्‍लिक करा 
  • त्यानंतर स्वतःची माहिती अपलोड करा. 
  • या प्रक्रियेनंतर लेखनाची संधी मिळते. 
  • ही सर्व प्रक्रिया मोफत आहे. 
  • तुम्हाला मिळालेल्या ज्ञानाचा केवळ सारांश यावर शेअर करावा. 
  • स्वतःचे आत्मचरित्र किंवा आक्षेपार्ह माहिती अपलोड करू नये.

Web Title: Marathi Content Significantly Less Wikipedia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top