माजी आमदार दिलीप माने यांच्या कारला अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

सोलापूर : देवदर्शनासाठी निघालेल्या माजी आमदार दिलीप माने यांच्या कारचा अपघात झाला. कारची दुचाकीस्वारास समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडला. 

शहाजी राऊत (वय55, रा.तांदूळवाडी, ता. माळशिरस) असे मृताचे नाव आहे. या अपघातात दिलीप माने आणि त्यांचा चालक किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे. माळशिरस तालुक्‍यातील तांदुळवाडी येथे हा अपघात झाला. 

माजी आमदार माने हे आपल्या कारने म्हसवड येथे देवदर्शनासाठी निघाले होते. यावेळी माळशिरस तालुक्‍यातील तांदुळवाडीनजीक साळमुख रोडवरील स्वामी समर्थ मंगल कार्यालय जवळ माने यांच्या कारची समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक झाली. यात दुचाकीस्वार शहाजी राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मयत राऊत यांच्या दुचाकीचे तसेच माजी आमदार माने यांच्या कारचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर प्राथमिक उपचार घेऊन माने हे सोलापूरला परत येत असल्याचे सांगण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news about accident -