'साई अहमदनगर श्री 2018'चा महेश गोसावी मानकरी

अमोल वाघमारे
बुधवार, 21 मार्च 2018

सावळीविहीर - नगर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने साई महासमाधी शताब्दी व गुढी पाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या 'साई अहमदनगर श्री 2018' स्पर्धेत अहमदनगरच्या महेश गोसावीने बाजी मारली. तर उपविजेते पद शिर्डीच्या निलेश वाडेकरला मिळाले.

सावळीविहीर - नगर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने साई महासमाधी शताब्दी व गुढी पाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या 'साई अहमदनगर श्री 2018' स्पर्धेत अहमदनगरच्या महेश गोसावीने बाजी मारली. तर उपविजेते पद शिर्डीच्या निलेश वाडेकरला मिळाले.

55, 60, 65, 70, 75 व 80 वजनी गटात झालेल्या या स्पर्धेत अनुक्रमे नवनाथ कुऱ्हे (कोपरगाव ), अली अब्बास(अहमदनगर ), नीलेश वाडेकर (शिर्डी), महेश गोसावी ( अहमदनगर), अल्ताफ शेख (श्रीरामपूर ), अतुल खडामकर( अहमदनगर) यांनी झालेल्या वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून अहमदनगर श्री फेरीसाठी पात्र ठरले. यात महेश गोसावीची निवड करण्यात आली. विजयी खेळाडूस रोख रक्कम 15 हजार, सन्मानचिन्ह तर उपविजेत्या खेळाडूंना 7 हजार व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

स्पर्धे दरम्यान स्पर्धकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी भारत श्री किरण सुभाष पाटील याने हजेरी लावून विविध प्रात्यक्षिके करून दाखवली. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, जागतिक स्तरावर खेळताना नेहमी जाणवते की,ग्रामीण भागातील तरुणांनी आपली शारीरिक संपत्ती वाढवून शरीर सौष्ठव स्पर्धेत भाग घ्यावा. आजच्या या स्पर्धा खेळाडूंना नवे व्यासपीठ मिळवून देईल तर उद्याचा मिस्टर इंडिया (भारत श्री) हा ग्रामीण भागातीलच असेल याची मला खात्री आहे. तरूणांनी व्यसनांपासून दूर राहवून शरीर संपत्ती कमवावी असा सल्ला त्यांनी उपस्थित तरूणांना दिला. यावेळी बोलताना निमगाव चे उपसरपंच अजय जगताप म्हणाले, निमगावच्या किरण पाटीलने देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमवून निमगाव, शिर्डी च्या ग्रामस्थांची छाती अभिमानाने फुगवली आहे.

साईबाबांच्या प्रतिमेचे निमगाव ग्रामपंचायत पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते पूजनाने स्पर्धेची सुरवात झाली. यावेळी कैलास कातोरे, उपसरपंच अजय जगताप, भाऊसाहेब रंगनाथ कातोरे, दत्तू गाडेकर, शिवाजी कातोरे, सुखदेव बारहाते, चांगदेव जगताप, गावातील प्रमुख कार्यकर्ते, सर्व तरुण मंडळे व प्रतिष्ठानचे सदस्य यावेळी उपस्थित होते. बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे मधुकर गायकवाड यांच्या पंच समितीकडून स्पर्धेचे परीक्षण झाले. साई प्रतिष्ठानचे संस्थापक धनंजय पाटील, रावसाहेब कडलग, अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी स्वागत करून आभार मानले.

Web Title: marathi news bodybuilding competition