लिंगमळ्याच्या जंगलात सुरू असलेल्या पार्टीवर पोलिसांची कारवाई 

representational image
representational image
Updated on

महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वरपासून जवळच असलेल्या लिंगमळ्याच्या घनदाट जंगलात बुधवारी रात्री सुरू असलेल्या पार्टीवर वनविभागाने कारवाई करून नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या त्यातील आठ जणांना आज (गुरुवार) महाबळेश्‍वर न्यायालयात हजर केले आहे. हे तरुण मिरज, नगर आणि मुंबई येथील उद्योजकांची मुले आहेत. पाचगणीतील एका शाळेचे ते माजी विद्यार्थी आहेत. 

'लिंगमळ्याच्या धबधब्याच्या पार्किंगमध्ये दिव-दमण पासिंगची दोन वाहने, तसेच 'एमएच-16' पासिंगचे एक वाहन उभे आहे. या वाहनातील पर्यटक धबधब्यातून परत आलेले नाहीत' अशी माहिती आरएफओ रणजित गायकवाड यांनी बुधवारी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी महाबळेश्‍वर पोलिसांना कळविली. पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन शोध मोहीम राबविली; मात्र हे पर्यटक कुठेही सापडले नाहीत. 

यामुळे पोलिसांनी महाबळेश्‍वर येथील रेस्क्‍यू ऑपरेशनच्या साहित्यासह महाबळेश्‍वर ट्रेकर्स ग्रुप आणि सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप अशा 16 जणांच्या पथकाने लिंगमळा जंगल परिसरात शोध मोहीम हाती घेतली. या पथकास जंगलात नऊ तरुण आढळले. गायकवाड यांनी त्या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अपप्रवेश नियमांतर्गत कारवाई केले. यात आकाश महाबळ (वय 23, मिरज), संभाजी गाडे (वय 24, नगर), हर्षल पटेल (वय 24, मुंबई), हेमचंद्र शहा (वय 24, मुंबई), प्रियंक पटेल (वय 25, मुंबई), ऋषिकेश गाडे (वय 24, नगर), शुभम जिने (वय 24, नगर), उमंग पटेल (वय 24, मुंबई), चांद पटेल (मुंबई) या तरुणांना पोलिसांनी महाबळेश्‍वरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. या तरुणांनी मादक पदार्थांचे सेवन केले आहे का, याची तपासणी रुग्णालयात करण्यात आली. यापैकी आठ तरुणांनी मद्यार्काचे सेवन केले होते; पण ते मद्यार्कांच्या अंमलाखाली नव्हते, असा अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. या तरुणांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियमाचे कलम 110-117 अंतर्गत कारवाई झाली आहे. त्यांना आज महाबळेश्‍वरच्या न्यायालयात हजर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sahyadri tiger kingdom power struggle
Social Reforms: MAnis Announces State-Level Awards for Dedicated Rationalist Activists
six people killed in Maharashtra Karnataka border land dispute vijapur chadchan crime
Crime
Marathi News Esakal
www.esakal.com