जनजागराची दिंडी आलिया गावा

अमोल वाघमारे
मंगळवार, 20 मार्च 2018

सावळीविहीर (नगर) - सकाळी सकाळी गावातुन ग्रामपंचायतीसमोर आलेल्या जनजागृतीपर दिंडीने ग्रामस्थ थबकले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतिने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' बरोबरच आरोग्यासंदर्भात भारुडातुन समाज प्रबोधन करुन ग्रामस्थांना याचे महत्तव पटवून देण्यात आले. मुलींचा जन्मदर कमी झालेल्या गावांमध्ये जनजागृती करुन समाजप्रोधन घडवुन आणण्यासाठी राष्ट्रीय समाज प्रबोधनकार भारुड सम्राट हमीद अमीन सय्यद यांनी सावळीविहीर बुद्रुक येथे समाज प्रबोधन केले. 

स्त्री जन्माचे स्वागत करुया, सासुरवाशीण लेक माहेराला जायी, पप्पा वाचवा माझ्या जीवाला अशा गीतांमधून  समाज प्रगोधन केले. सय्यद म्हणाले ज्या महापुरुषांना आज तुम्ही डोक्यावर घेवुन नाचता धन्य त्यांची माता आहे. आजची स्त्री उद्याची भविष्यवाणी आहे. मुल-मुली भेदाभेद काय करताय? सरपंच ते राष्ट्रपती आणि विविध क्षेत्रात आज महिलांनी अधिराज्य गाजवले आहे. सावळीविहीरच्या सरपंच रुपाली आगलावे, उपसरपंच वृषाली जपे, जिजाबा आगलावे यांनी या जनजागृती दिंडीचे स्वागत केले. आभार बाळासाहेब जपे यांनी मानले. 

यावेळी संगीत कलाकार भाऊसाहेब मनाळ, विशाल साळवे, संकेत वामन, अविनाश लोखंडे, अप्पासाहेब आहेर, पंचायत समितीचे आरोग्य सहायक राजेंद्र फंड, माजी सरपंच विनायक आगलावे, माजी सरपंच सोपान पवार, गणेश कापसे, संतोष आगलावे, अनिल वाघमारे डॉ.नीतीन गोसावी यांच्यासह, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थीत होते.

Web Title: marathi news nagar beti bachao beti padhao