लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकासाठी एक कोटी दहा लाख मंजूर

सिद्धार्थ लाटकर  
शुक्रवार, 9 मार्च 2018

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे दौलतनगर (ता. पाटण) येथे स्मारक बांधण्यासाठी नऊ कोटी 96 लाख 90 हजार इतक्‍या रकमेचा आराखडा व अंदाजपत्रकास शासन निर्णयान्वये सन 2015 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

सातारा - पाटण तालुक्‍याचे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे दौलतनगर (ता. पाटण) येथे स्मारक बांधण्यासाठी राज्य शासनाने एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी आज (शुक्रवार) मंजूर केला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे दौलतनगर (ता. पाटण) येथे स्मारक बांधण्यासाठी नऊ कोटी 96 लाख 90 हजार इतक्‍या रकमेचा आराखडा व अंदाजपत्रकास शासन निर्णयान्वये सन 2015 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच आतापर्यंत एकूण आठ कोटी 86 लाख 90 हजार रुपये इतका निधी जिल्हाधिकारी, सातारा यांना मंजूर व वितरित करण्यात आला आहे. तथापि सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाने एका कोटी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नऊ मार्च 2018 च्या पत्रान्वये केली होती. या मागणीची शासनाने पूर्तता करत एका कोटी दहा लाख रुपयांच्या निधीस मान्यता दिल्याचा अध्यादेश काढला आहे.

Web Title: marathi news satara balasaheb desai memorial one crore ten lakh