श्रृती ठरली महाराष्ट्राची पहिली 'बालयोगीनी'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

उपळाई बुद्रूक(सोलापूर) - आपल्या कुशल व दमदार कामगिरीच्या जोरावर उपळाई बुद्रूकच्या सुपूत्र व कन्यांनी गावाचे नाव देशाच्या कानाकोपर्यांत गाजवलेले आहे. प्रशासकीय क्षेत्रात दबदबा असणार्यां या गावातील मुलांनी इतर क्षेत्रातही उत्तुंग भरारी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी रोहिणी भाजीभाकरे यांचा सर्वात्कृष्ट जिल्हाधिकारीमध्ये समावेश ही कौतुकास्पद बाब असताना त्यात अजुन एक भर पडली आहे. याच गावातील श्रृती महादेव शिंदे या मुलीने योगप्रशिक्षण क्षेत्रात मोठे नावलौकिक मिळवले असून, आपल्या कौशल्यपुर्ण योगप्रशिक्षणांच्या माध्यामातुन श्रृती महाराष्ट्र राज्यांची पहिली 'बालयोगीनी' ठरली आहे. 

मुळची उपळाई बुद्रूक येथील असणारी श्रृती शिंदे सध्या मुंबई येथे वास्तव्यास आहे. श्रृतीचे वडिल खाजगी कंपनीत नोकरी करतात. तर आई योगशिक्षीका आहे. आईची प्रेरणा घेत श्रृतीने वयाच्या ८ व्या वर्षापासुन योगाभ्यास प्रशिक्षण घेत योगाशिबीराच्या माध्यामातुन मुबंईसह शहरी परिसरात योगाशिक्षक (इन्सट्रक्टर) म्हणुन आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. "डोंबिवली योगा अॅन्ड क्चरल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सुहासिनी योगा सेंटर अॅन्ड फिटनेस सेंटर"च्या योगाविभागाची प्रमुख योगप्रशिक्षीका म्हणुन ती काम करत आहे.

या सेंटरचे संचालक प्रविण बेंदकर यांच्यामार्फत योग फिटनेसचे प्रशिक्षण घेऊन याच क्षेत्रात करिअर करण्याचा तिचा संकल्प केला आहे. आतापर्यंत तिला "महाराष्ट्राची बालयोगिनी" आणि "ठाणे योगरत्ना" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  सध्या ती योग प्रशिक्षण व्यवसाय कोर्स घेत असतानाच कार्पोरेट क्षेत्रात मोठमोठ्या शिबीरांचे आयोजन करुन योगप्रशिक्षण देत आहे. करिअर आणि व्यवसाय म्हणून हे काम करत असताना विशेष गरजा असणार्या मुलांना आणि शालेय विद्यार्थ्यांना ती मोफत योगप्रशिक्षण देत आहे.

शहरी भागात योगाचा प्रचार आणि प्रसार असला तरी ग्रामीण भागात तितकीशी जागृती नसल्याने ग्रामीण भागात मोफत प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून ती सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करीत आहे. तिने आतापर्यंत अनेक टिव्ही सीरियल मध्येही काम केले आहे. एक मुलगी म्हणुन श्रुतीने ज्या क्षेत्रात पुरूषांची मक्तेदारी आहे, त्या योगा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.  

योगगुरू रामदेवबाबांनी केले कौतुक.
 योगगुरू रामदेवबाबा यांच्यासमवेत योगाप्रात्यक्षिके करण्याची सुवर्णसंधी तिला काही महिन्यापूर्वी मिळाली होती. तिचा हा कार्यक्रम १५० देशात दाखविण्यात आला होता. याबद्दल तिच्या योगा प्रात्यक्षिकाचे कौतुक रामदेवबाबांनीही केले आहे.

हल्लीच्या स्पर्धेच्या युगात जवळपास सर्वच महिलांचे दिनक्रम्र बिगडला आहे. तेंव्हा योगाने शरीराचे आरोग्य सुधारते व आहारावर नियंत्रण राहते. योगसंस्कार आजच्या स्त्री कडे आली तर भारताची भावी पिढी सदृढ ठेवण्याची क्षमता स्त्री ठेवु शकतो. 
श्रृती शिंदे - बालयोगप्रशिक्षक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news solapur news shruti shinde balyogini