सोलापूरची गड्डा यात्रा जगात भारी!

परशुराम कोकणे
शनिवार, 13 जानेवारी 2018

लहानपणी गड्डा यात्रा म्हणजे दिवाळी सारखा उत्साह असायचा. कुटूंबातील सदस्यांसोबत यात्रेत गेल्यावर भाग्यश्रीचा बटाटेवडा आवडीने खायचो. गड्ड्यावरची टोपी, धनुष्यबाण, टोराटोरा, दारुकाम याचे आकर्षण असायचे. मी २०१५ पासून परदेशात आहे. इकडे सर्व नियमांचे पालन करून यात्रा होतात. आपल्या गड्डा यात्रेत धुळीचा त्रास असतो. यावर उपाय गरजेचा आहे. एक इव्हेंट म्हणून यात्रेकडे पाहायला हवे. 
- शुभम महागांवकर, विद्यार्थी

सोलापूर : सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेला म्हणजेच गड्डा यात्रेला सुरुवात झाली आहे. जानेवारी महिना आला की सर्वांनाच गड्डा यात्रेचे वेध लागतात. वयाने मोठे झालो असलो तरी लहानपणी आई-बाबांसोबत गड्ड्यावर गेलेल्या आठवणी प्रत्येकाच्या स्मरणात आहेत. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात असलेल्या सोलापूरकरांनी गड्डा यात्रेबद्दल आपल्या आठवणी 'ई सकाळ'सोबत शेअर केल्या आहेत.

लहानपणी गड्डा यात्रा जवळ आली की आम्ही खूपच उत्साहित व्हायचो. यात्रेच्या कालावधीत आजीकडे येऊन रहायचो. गड्ड्यावर फिरायला गेल्यावर लाकडी बॅट घेण्यासाठी मी पप्पांकडे हट्ट करायचो. दहावीपर्यंत घरच्यांसोबत आणि कॉलेजला असताना मित्रांसोबत गड्डा यात्रेत खूप मज्जा केली आहे. आजही ते दिवस आठवले की आनंद होतो. मी 2013 पासून परदेशात आहे. जानेवारी महिना आला की गड्डा यात्रेचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. इकडे स्वीडनमध्ये ख्रिसमसला आपल्या गड्डा यात्रेसारखा उत्सव असतो. खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि पाळणे असतात. गड्डा यात्रेतील धुळीमुळे लोकांना त्रास होतो, उत्तम नियोजन केल्यास खरंच यात्रेला स्मार्ट लुक येईल. 
- धनंजय बरबडे, रिसर्च इंजिनिअर, स्वीडन 

अमेरिकेत आल्यानंतर मी डिस्ने पार्क, युनिव्हर्सल स्टुडिओ आणि इतर अनेक ठिकाणी भेट दिली आहे, परंतु सोलापूरच्या गड्डा यात्रेत हृदयात एक वेगळेच स्थान आहे. जानेवारी महिना आला की सोलापूरला जाऊन गड्डा यात्रेकडे जाण्याची इच्छा असते. पुढच्या वर्षी मी माझ्या मुलींना आवर्जून गड्डा यात्रा फिरण्यासाठी घेऊन जाईन. लहानपणी कुटुंबातील सदस्यांसह गड्डा यात्रेत जायचो. माझा भाऊ ऍड. जयदीप माने आणि बहीण डॉ. दीप्ती माने यांच्यासोबत मज्जा यायची. यात्रेत नातेवाईकही भेटायचे. शाळेतून आल्यावर मुलांना गड्डा यात्रेचे वेध लागायचे. गड्डा यात्रेत उंचच उंच पाळणे पाहून मज्जा यायची. विशेष म्हणजे मिरर शो भारी वाटायचा. सर्वांत आश्‍चर्यकारक म्हणजे साहसाने बाईक चालवून दाखविण्यात येणारा मौत का कुआँ. आपल्या मनोरंजनासाठी बाईकस्वार जीव धोक्‍यात घालतात. 
- गीतांजली साळोखे-माने, यूएसए 

लहानपणी गड्डा यात्रा म्हणजे दिवाळी सारखा उत्साह असायचा. कुटूंबातील सदस्यांसोबत यात्रेत गेल्यावर भाग्यश्रीचा बटाटेवडा आवडीने खायचो. गड्ड्यावरची टोपी, धनुष्यबाण, टोराटोरा, दारुकाम याचे आकर्षण असायचे. मी २०१५ पासून परदेशात आहे. इकडे सर्व नियमांचे पालन करून यात्रा होतात. आपल्या गड्डा यात्रेत धुळीचा त्रास असतो. यावर उपाय गरजेचा आहे. एक इव्हेंट म्हणून यात्रेकडे पाहायला हवे. 
- शुभम महागांवकर, विद्यार्थी

Web Title: Marathi news Solapur news siddheshwar yatra

टॅग्स