Margubai Yatra : आषाढ महिन्यातल्या यात्रांमुळे अंडी, कोंबडी झाली महाग; यात्रेत देवीसाठी कापला जातो कोंबडा

जत पूर्व भागात या देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात असते. या यात्रेत कोंबडा देवीसाठी कापला जातो.
Margubai Devi Yatra Eggs chickens
Margubai Devi Yatra Eggs chickensesakal
Updated on
Summary

आषाढ महिन्यात या परिसरात वारा प्रचंड मोठ्या प्रमाणात सुटतो. या महिन्यात खास करून कोंबड्याचा बेत केला जातो.

माडग्याळ : येथे अंडी व कोंबडी यांचा बाजार मोठा भरतो. या भागात देशी अंडी व कोंबडी मिळतात. आषाढ महिना (Ashadha Month) सुरू झाल्याने या भागात अनेक गावांत गावदेवी मरगूबाईदेवीची यात्रा (Margubai Devi Yatra) मंगळवारी व शुक्रवारी करतात. या यात्रांमुळे सध्या अंडी व कोंबड्यांचे दर वाढले आहेत.

जत पूर्व भागात या देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात असते. या यात्रेत कोंबडा देवीसाठी कापला जातो. तेथून घरी नेऊन खास कोंबड्याची मेजवानी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात करतात. याशिवाय, आषाढ महिन्यात खास कोंबड्याची मेजवानी करतात. शिवाय, अंडीही मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

Margubai Devi Yatra Eggs chickens
सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांसाठी धोक्याची घंटा! पाण्याची फूग शिरोळपर्यंत, 'आलमट्टी-हिप्परगी'चा साठा 100 TMC पार

आषाढ महिन्यात या परिसरात वारा प्रचंड मोठ्या प्रमाणात सुटतो. या महिन्यात खास करून कोंबड्याचा बेत केला जातो. येथील अंडी, कोंबड्यांचा बाजार सकाळी सात ते दहा पर्यंत मोठ्या प्रमाणात असतो. देशी अंडी व कोंबडी या भागात मिळतात. सध्या ग्राहक वाढल्याने अंडी व कोंबडी यांचे दर भडकले आहेत. एक किलो कोंबडा दर ६०० ते ७०० रुपये दर झाला आहे. देशी अंडी शेकडा ७०० दर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.