मार्केटस्‌, दुकाने आता सायंकाळी सातपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

सांगली, ः सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील सर्व मार्केटस्‌ व दुकाने यांना उद्यापासून ( ता. 9) आठवड्यातील सर्व सात दिवस सकाळी 9 ते सांयकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्यास शासन आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परवानगी दिली आहे. 

यापूर्वी मार्केटस्‌, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी होती. या कालावधीत शासन आदेशानुसार बदल करून आता सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. अत्यावश्‍यक सेवा व औषधी दुकाने यांना सदर वेळेचे बंधन राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. वेळोवेळी कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या प्रत्येक स्थलसीमा हद्दीत सदरचा आदेश लागू राहणार नाही. तथापि अशा क्षेत्रापुरते यापूर्वी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित केलेले सर्व प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Markets‌, shops now allowed to remain open until seven in the evening

Tags
टॉपिकस
Topic Tags: