जिल्ह्यात बाजारपेठा नऊपर्यंत... हॉटेल-बार दहापर्यंत सुरु राहणार : जिल्हाधिकारी-व्यापाऱ्यांची बैठक

अजित झळके
Thursday, 8 October 2020

सांगली-  सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात बाजारपेठा रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी आणि व्यापारी एकता असोसिएशनच्या बैठकीनंतर अध्यक्ष समीर शहा यांनी व्यापाऱ्यांना तशा सूचना दिल्या. सर्व ते नियम पाळून सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत व्यवहार सुरु ठेवावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, हॉटेल, बार, फूडकोर्ट रात्री दहापर्यंत सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

व्यापारी पेठा नेमक्‍या किती वेळापर्यंत सुरु ठेवायच्या, याबाबत संभ्रमावस्था होती. जिल्हा पातळीवर प्रशासनाने कोणतेही आदेश जारी केले नसल्याने नेमके काय करावे, असा प्रश्‍न घेऊन व्यापारी एकता असोसिएशनने आज जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची भेट घेतली. श्री. चौधरी यांनी पूर्ववत पेठा सुरु ठेवण्यात काही हरकत नसल्याचे सांगतानाच काही आदेश आल्यास त्याचा तत्काळ अंमल करावा लागेल, असे स्पष्ट केले. शिवाय, सर्व ती काळजी घ्यावी, अंतराचा नियम, मास्क, सॅनिटायझरचा वापर सक्तीने करावा, अशा सूचना दिल्याचे श्री. शहा यांनी सांगितले. 

श्री. शहा म्हणाले, ""सध्या दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेबाबतीत संभ्रम निर्माण झाला होता. त्या बाबत जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली. आजपासून पूर्वरत सर्व दुकाने नियमित वेळेनुसार सुरू ठेवण्यास हरकत नाही. सध्या सांगली जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येचा आलेख कमी होत आहे. तो आणखी कमी करणे गरजेचे आहे. यात व्यापाऱ्यांकडून कोणतीही हयगय होणार नाही. सर्व नियमांचे पालन केले जाईल, अशी ग्वाही आम्ही दिली आहे. राज्य शासनाने यात कोणताही बदल केला तर सुधारित आदेश प्रशासन काढेल. त्यानुसार बदल करावा लागेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आज पासून सर्व त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना पाळून आपले व्यवसाय सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत सुरू राहतील.'' 
 
तर हॉटेल, बारवर कारवाई 

हॉटेल, बारा, फूड कोर्ट, रेस्टॉरंट, खाद्यगृहे ही रात्री दहापर्यंत सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर ती सुरु ठेवता येणार नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले. रात्री दहानंतर हे सुरु राहिले तर मात्र कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Markets in the district will continue till 9 pm. Hotel-Bar will continue till 10 pm: Collector-Traders meeting