सांगलीत बाजारपेठा खुल्या... जनता कर्फ्यूला अत्यल्प प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

जनतेनेच पुढाकार घ्यावा, घरात थांबावा, बाजारपेठा बंद ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला व्यापारी संघटनांना विरोध करत आज बाजारपेठा खुल्या ठेवल्या. त्यामुळे या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. लोकांची गर्दी कमी असली तर जनता कर्फ्यू अयशस्वी ठरताना दिसतोय. 

सांगली ः कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना व्यापाऱ्यांसह सर्वांनी कडक लॉकडाऊनची मागणी केली होती, मात्र केंद्र सरकारच्या निर्देशानुसार खूप मान्यतेनंतरच लॉकडाऊन करता येत असल्याने आजपासून केवळ जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता.

जनतेनेच पुढाकार घ्यावा, घरात थांबावा, बाजारपेठा बंद ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला व्यापारी संघटनांना विरोध करत आज बाजारपेठा खुल्या ठेवल्या. त्यामुळे या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. लोकांची गर्दी कमी असली तर जनता कर्फ्यू अयशस्वी ठरताना दिसतोय. 

सांगली जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वीस हजाराचा टप्पा पार करून गेली आहे. गेल्या काही दिवसांत एका दिवसाला एक हजाराहून अधिक रुग्ण बाधित आढळून आले आहेत. जिल्हा समूह संसर्गाच्या टप्प्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशावेळी लॉकडाऊन करून 14 दिवस कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन करण्यात आले होते. पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी चर्चा केली होती. परंतू, केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय असा लॉकडाऊन आता शक्‍य नसल्याने जनता कर्फ्यूचा मार्ग काढण्यात आला. त्याला मात्र व्यापाऱ्यांनी विरोध केला आणि आज बाजारपेठा खुल्या ठेवण्यात आल्या. तुलनेत बाजारात खूपच तुरळक ग्राहक आहेत, ही जमेची बाजू आहे. 

येथील कापडपेठ, गणपती पेठ, हरभर रोड, मारुती रोडवरील बहुतांश दुकाने सुरु ठेवण्यात आली आहे. भाजी मंडईतही भाजीवाल्यांनी ठाण मांडले आहे.अर्थात त्यांची संख्या आज कमी आहे. ग्राहक बाहेर पडतील की नाही, याबाबत साशंकता असल्याने भाजी विक्रेत्यांनी सकाळी सौद्यातून फार माल उचलला नाही, असे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Markets open in Sangli ... Very little response to public curfew