Sangli : वृक्षारोपण केल्यावरच होणार विवाह नोंदणी: अग्रण धुळगाव ग्रामपंचायतीचा उपक्रम; वृक्ष लागवड, संवर्धनास प्रोत्साहन
Marriage registration with tree plantation: वृक्ष लागवडीच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामपंचायतीने वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. लग्नसमारंभातून वृक्षारोपणाचा प्रसार केला आहे. ग्रामपंचायतीच्या दप्तरी विवाह नोंदणी आवश्यक असते. त्यासाठी ग्रामपंचायतीने पाच झाडे लावल्याशिवाय नोंद होणार नाही, असे नोटीस बोर्डावर जाहीर केले आहे.
Dhulgav Gram Panchayat’s initiative encourages tree plantation before marriage registration to promote sustainability and environmental consciousness.sakal
रांजणी : ‘अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीने नववधू-वराने पाच रोपे लावणे व संवर्धन करण्याची जबाबदारी घ्यावी, तरच त्यांच्या विवाहाची नोंदणी दप्तरामध्ये करण्यात येईल,’ अशी नोटीस काढून अनोखा उपक्रम राबवण्यास सुरवात केली आहे.