किल्लेमच्छिंद्रगड - अंगी साहस, शौर्य आणि देशाप्रती अफाट प्रेम असल्यामुळेच शहीद प्रशांत पाटील यांनी शत्रूला नामोहरम केले. मात्र समोरासमोर लढताना त्यांना वीरमरण आले. अशा शब्दात केंदिय पोलिस राखीव दलाचे सब इन्स्पेक्टर रामचंद्र कदम यांनी किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे शहीद प्रशांत पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त बोलताना मनोगत व्यक्त केले.