
येरमाळा : येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रा राज्यातील मोठया प्रमाणात भरणारी यात्रा म्हणून यशस्वी यात्रा ठरली आहे.यंदा श्री येडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरली असुन देवीच्या यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम आज ब?रवीवारी (ता.१३) रोजी मोठया उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी राज्यासह बाहेर राज्यातील पंधरा लाखांच्या वर भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले होते.येडेश्वरी देवीची पालखी मंदिरावरुन चुन्याच्या रानात येताच लाखों भाविकांनी चुनखडीचे खडे वेचुन पालखीवर टाकत आई राधा उदे उदेचा एकच जय घोष केला भाविकांच्या या गजराने चुन्याच्या रानाचा परिसर दुमदुमून गेला होता.