... आणि मौजे सांगावातही खळबळ

कृष्णात माळी
Friday, 10 July 2020

कागल पूर्व भागात पहिल्यांदाच रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रतिबंधक समितीच्या वतीने सात दिवस गाव बंद ठेवण्यात येणार आहे.

कसबा सांगाव - मौजे सांगाव (ता. कागल) येथील युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. कागल पूर्व भागात पहिल्यांदाच रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रतिबंधक समितीच्या वतीने सात दिवस गाव बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा- लग्न कार्यासाठी पूर्वीचेच नियम ; अफवांवर विश्‍वास ठेवू नका.

बाधित युवक कोल्हापुरातील एका खासगी बॅंकेत नोकरी करतो. मित्राला भेटण्यासाठी युवक शनिवारी (ता. 4) चंदगड येथे गेला होता. दरम्यान, चंदगड येथील मित्राचे वडील पॉझिटिव्ह आढळले. थेट संपर्कात आल्याच्या कारणावरून चंदगड येथील मित्राने युवकास तपासणी करण्यास सांगितले होते. सुरवातीला याला लक्षणे दिसली नव्हती. मात्र कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील रुग्णालयातमध्ये तपासणी करून घेतले असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आई आणि वडिलांसह प्रथम आणि थेट संपर्कात आलेल्या 12 जणांना कागल येथे तपासणीसाठी पाठवले आहे. अजूनही काही संपर्कात आलेल्यांच्या शोध प्रशासन घेत आहे. गावात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निर्जंतुकीकरण औषध फवारणीचे काम सुरू आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने रुग्ण आढळलेला परिसर सील केला सात दिवस गाव पूर्णतः बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

संपादन - रंगराव हिर्डेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mauje Sangaon young became corona positive