मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे अडचणीत

Maval Tehsildar Madhusudan Barge in trouble
Maval Tehsildar Madhusudan Barge in trouble

पंढरपूर (सोलापूर) : शेत रस्ता प्रकरणातील निकाला संदर्भात पंढरपूरचे तत्कालीन व सध्या मावळ येथे कार्यरत असलेले तहसीलदार मधुसूदन बर्गे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. एकाच प्रकरणी दोन वेगवेगळे निकाल दिल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु आहे. याच दरम्यान लाचलुचपत विभागानेही या तक्रारीची गांभिर्याने दखल घेतली आहे. तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात लाचलुचपत विभागाचे अपर पोलिस अधीक्षक अजय आफळे यांनी महसूल विभागाकडे तसा अभिप्राय मागितला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरु केलेल्या कार्यवाहीमुळे तहसीलदार बर्गे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. लाचलुचपत विभागाने सुरु केलेल्या कार्यवाहीमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- ‘या’ महापालिकेत कुंपणच खाई शेत... त्याला नाही लाज..!
काय आहे प्रकरण

केसकरवाडी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी रामचंद्र नामदेव केसकर आणि श्रीरंग विठु केसकर यांच्यात शेत रस्त्यावरुन वाद सुरु आहे. हे प्रकरण तत्कालीन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या समोर आले होते. त्यावेळी श्री. बर्गे यांनी प्रत्यक्ष शेत रस्त्याची पाहाणी करुन रामचंद्र नामदेव केसकर यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर याच प्रकरणात 18 जुलै 2019 रोजी श्री. बर्गे यांनी पुन्हा विरोधी निकाल दिला आहे. याप्रकरणात तहसीलदार श्री.बर्गे यांनी आर्थिक हितसंबंध जोपासून चुकीच्या पध्दतीने निकाल दिल्याची तक्रार रामचंद्र केसकर यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे केली होती. आय़ुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेवून तत्काळ कार्यवाही सुरु केली. तक्रारीचे गांभिर्य विचारात घेऊन याप्रकरणाची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. श्री. ढोले यांनी चौकशी अहवाल महसूल प्रशासनाला पाठवला आहे.
दरम्यान या प्रकरणाची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही ही दखल घेतली आहे. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे खातरजमा झाल्यानंतर लाचलुचपत विभागाने तहसीलदार बर्गे यांच्यावर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाकडे तसा अभिप्राय मागितला आहे. या संदर्भात लाचलुचपत विभागाने 8 जानेवारीला तसे लेखी पत्र महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहे. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1998चे कलम 17 (अ) प्रमाणे पुढील कारवाईसाठी त्वरीत लाचलुचपत विभागाला तसे आदेश द्यावेत त्या प्रमाणे पुढील कारवाई केली जाईल असेही अपर पोलिस अधीक्षक श्री. आफळे यांनी महसूल विभागाला दिलेल्या पत्रात पत्रात नमूद केले आहे. तहसीलदारांच्या विरोधातील तक्रारीची महसूल आणि लाचलुचपत प्रतिबंधक दखल घेवून कार्यवाही सुरु केल्याने महसूल विभागात याची चर्चा सुरु झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com