कोरोनाच्या सावटाखाली मायाक्का देवी यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mayakka Devi Yatra

विविध राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचलीतील मायाक्कादेवीच्या यात्रेस बुधवार (ता. १६) पासून प्रारंभ झाला.

कोरोनाच्या सावटाखाली मायाक्का देवी यात्रा

रायबाग - चिंचली (ता. रायबाग) येथील मायाक्का देवीच्या यात्रेचा (Mayakka Devi Yatra) आज, रविवारी (ता. १२) मुख्य दिवस झाला. त्यानिमित्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र जाधव सरकार व मानकऱ्यांच्या उपस्थितीत महापूजा, महानैवेद्य (बोनी) व पालखी सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यंदाही कोरोनाच्या (Corona) सावटाखाली साधेपणाने येथील यात्रा साजरी करण्यात आली.

दरवर्षी कर्नाटक महाराष्ट्रासह विविध प्रांतांतील लाखोंचा भक्तिसागर मायाक्का देवीच्या दर्शनासाठी लोटत. दिवसभर भंडाऱ्यात न्हाऊन गेलेल्या भाविकांकडून 'मायाक्का देवीच्या नावानं चांगभलं...' चा अखंड गजर होता. पण दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेवर बंदी घातली आहे. यंदाही त्याचा प्रत्येय आला.

विविध राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचलीतील मायाक्कादेवीच्या यात्रेस बुधवार (ता. १६) पासून प्रारंभ झाला. त्यानिमित्त देवीची दररोज विशेष पूजा झाली. रविवारी (ता. 20 ) यात्रेचा मुख्य दिवस होता. त्यानिमित्त मानकरी व भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार झाले. परंपरेनुसार दुध ओढ्यात भाविक स्नान करून आले. कोरोनामुळे भाविकांना यात्राकाळात वास्तव्यास मनाई करण्यात आली होती.

हेही वाचा: मतविभाजन हाच 'एमआयएम'चा डाव! महाराष्ट्र राज्य वक्‍फ बोर्डाचे अध्यक्षांची टीका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार यंदाही यात्रा साधेपणाने झाली. दरवर्षी कर्नाटकासह महाराष्ट्रातील लाखो भाविक यात्रेसाठी दाखल होत. विविध प्रकारची हजारो दुकाने थाटली जावून कोट्यवधींची उलाढाल होत. विविध आगारातून कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविकांच्या सोयीसाठी शेकडो जादा बस सोडल्या जात. पण दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रेअभावी हजारो व्यावसायिकांसह व्यापाऱयांना फटका बसला आहे.

यात्रेत चोख पोलिस बंदोबस्त

मायाक्का देवी यात्रेत महाराष्ट्रातील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. त्या पार्श्वभूमीवर अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश, रायबागचे निरीक्षक के. एस. हट्टी व कुडचीचे उपनिरीक्षक शिवराज दरीगौड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे किरकोळ प्रकार वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

Web Title: Mayakka Devi Yatra Under The Auspices Of Corona

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusYatra
go to top