धक्‍कादायक...हमीपत्राशिवाय जाहीर होईना एमबीएचा निकाल 

ahilyadevi-holkar solapur univercity
ahilyadevi-holkar solapur univercity
Updated on

सोलापूर : दोन वर्षांपूर्वी 48 विद्यार्थ्यांनी मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट, सोलापूर येथे एमबीएला प्रवेश घेतला. आता अभ्यासक्रम पूर्णही झाला मात्र, 48 विद्यार्थ्यांच्या हाती निकाल पडलाच नाही. प्रवेशावेळी पात्रतेचे निकष पूर्ण न केल्याने दोन, तीन व चौथ्या सेमिस्टरचा निकाल राखून ठेवण्यात आला. आता विद्यार्थी व पालकांच्या हमीपत्रावर दोन आणि तीन सेमिस्टरचा निकाल लावण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. 


मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांना एमबीए अभ्यासक्रमाला प्रोव्हिजनल ऍडमिशन दिले. दोन वर्षात त्यांच्याकडून पात्रतेचे निकषही पूर्ण करुन घेतले नाहीत. या प्रकरणी विद्यापीठाने इन्स्टिट्यूटला दंडही ठोठवल्याची चर्चा आहे. आता तो दंड या इन्स्टिट्यूटने विद्यापीठाला भरल्याने निकालाची प्रक्रिया मार्गी लागली. विद्यार्थी व पालकांच्या तक्रारीतून मार्ग काढीत इन्स्टिट्यूटने विद्यापीठाला पत्र पाठवून हमीपत्रावर निकाल जाहीर करण्याची विनंती केली. त्यानुसार विद्यापीठाने चौथे सेमिस्टर सोडून अन्य दोन सेमिस्टरचा निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तंत्रनिकेतन प्राधिकरणाकडून या विद्यार्थ्यांची अंतिम यादी मंजूर होईपर्यंत शेवटच्या सेमिस्टरचा निकाल जाहीर होणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, इन्स्टिट्यूटला या 48 विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता पूर्ण करावी लागणार आहे. या प्रकरणी मागील काही महिन्यांपूर्वीही विद्यार्थ्यांनी आवाज उठविला होता. तरीही इन्स्टिट्यूटकडून विंलबच लागला. इन्स्टिट्यूटचा दरवाजा ठोठावून पालकही दमले मात्र, तरीही प्रवेश पात्रतेची प्रक्रिया संथगतीने सुरुच असल्याचे चित्र आहे. 

पात्रता निकष पूर्ण प्रक्रिया सुरु 
विद्यापीठाने केलेला दंड इन्स्टिट्यूटने भरला असून तंत्रनिकेतन प्राधिकरणानेही या विद्यार्थ्यांची यादी मंजूर केली आहे. अंतिम यादी दोन दिवसात प्रसिध्द होईल. तत्पूर्वी, विद्यापीठाने 48 विद्यार्थ्यांचा निकाल लावण्याचा निर्णय घेतला आहे. पात्रता निकष पूर्ण करण्याचीही प्रक्रिया सुरु झाली आहे. 
- प्रमोद वैद्य, प्रभारी संचालक, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट, सोलापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com