ड्रग्ज कसे तयार करायचे असे लिहिलेली एक डायरी छाप्यावेळी मिळाली आहे. ती ताब्यात घेण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे.
विटा : येथील कार्वे (ता. खानापूर) औद्योगिक वसाहतीत असलेल्या रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीजवर छापा टाकून २९ कोटी ७३ लाख ५५ हजार २०० रुपयांचे एमडी ड्रग्ज (MD Drugs) व त्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. याप्रकरणी रहुदीप धानजी बोरिया (४१, उत्तीयादरा कोसंबा, जि. सूरत, गुजरात राज्य), सुलेमान जोहर शेख (३२, मुंबई), बलराज अमर कातारी (२४, साळसिंगे रोड, विटा) या संशयितांना अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.