सातारा - तळमावलेत राष्ट्रवादीची हल्लाबोल आंदोलन बैठक संपन्न 

जयभीम कांबळे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

तळमावले (सातारा) : तळमावले (ता.पाटण) विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची हल्लबोल आंदोलन बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी युवा नेते सत्यजित पाटणकर यांनी हजेरी लावून कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले.

भाजप सरकारच्या अनाधुंदी काराभराबद्धल राष्ट्रवादी काँग्रेस ने येत्या 9 तारखेला पाटण मध्ये हल्लाबोल आंदोलन पुकारले आहे. यात राष्ट्रवादीचे अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे यांसह दिगग्ज नेते उपस्थित राहणार आहेत.

नियोजन बैठकीत युवा नेते सत्यजित पाटणकर यांनी सरकारच्या कारभाराचा कार्यकर्त्यांना पाडा वाचून दाखवताना सांगितले की, हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे, हमीभाव मिळत नाही, सामान्य जनतेला पेट्रोल डिझेल ने घाम फोडला आहे अशी दयनीय अवस्था सरकारने आणली असून याबाबत आता आपल्याला हल्लाबोल आंदोलन करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता कामाला लागून 9 तारखेच्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने हजर राहण्याचे आवाहन केले.

या नियोजन बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, अविनाश जानुगडे, सुरेश निंबाळकर, अरविंद शिबे, उपसरपंच तळमावले- अंकुश आतकरी, बापूसो सावंत, आदीकराव माने, अनाम काळे, उपसरपंच मानेगाव- अविनाश माने, संजय भुलूगडे, विजय वाघ, रमेश मोरे, बाबासो ताईगडे, बाबुराव भुलूगडे, यवक अध्यक्ष विशाल मोरे, अविनाश डाकवे, राजाराम मोरे आदी मंडळी सह स्थानिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.     

Web Title: meeting of hallabol agitation of rashtravadi at satara