शिक्षक संघाची महामंडळ कोल्हापुरात 19 जानेवारीला सभा 

शिक्षक संघाची महामंडळ कोल्हापुरात 19 जानेवारीला सभा 

सोलापूर ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा 19 जानेवारीला कोल्हापूर येथे होणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे यांनी दिली. जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेत महामंडळ सभेच्या पूर्वतयारीसाठी आयोजित केलेल्या शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या सहविचार सभेनंतर त्यांनी ही माहिती दिली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते महामंडळाचे उद्‌घाटन होणार आहे. सभेचे अध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील असतील. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री सतेज पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित राहणार आहेत. 

जुनी पेन्शन योजना लागू करणे, नगरपालिका व महापालिका शिक्षकांना 100 टक्के वेतन अनुदान, 27 फेब्रुवारी 2017 च्या बदली धोरणात सर्वसमावेशक आवश्‍यक बदल करणे, शिक्षकांना बीएलओ आणि इतर अशैक्षणिक कामातून मुक्त करणे, केंद्रप्रमुख 50 टक्के पदे पदवीधर शिक्षकातून पदोन्नतीने भरणे, संगणक प्रशिक्षणाची मुदतवाढ मिळणे या विषयांवर महामंडळ सभेत पाठपुरावा केला जाणार आहे. 

तत्पूर्वी सहविचार सभेमध्ये शिक्षक संघाचे दिवंगत नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील आणि शिक्षक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष जयकुमार आलमेलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिक्षकांनी आपले प्रश्‍न सोडविण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने महामंडळ सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस बब्रुवाहन काशीद यांनी केले. यावेळी कोशाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, कार्याध्यक्ष ज्योतिराम बोंगे, राज्य संघाचे उपाध्यक्ष संजय चेळेकर, संजय सरडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बापूराव पाटील, जिल्हा पतसंस्थेचे संचालक हणमंत सरडे, महादेव जठार, राम इंगळे, सविता गाडे, तालुकाध्यक्ष योगेश बारसकर, राजेंद्र आवारे, सचिन देशमुख, महावीर उन्हाळे, अनिरुद्ध पवार, संभाजी तानगावडे, तात्या यादव, दिलीप ताटे, नामदेव कुचेकर, अशोक पवार, प्रिया सहस्रबुद्धे, प्रमिला हिबारे, सीता पाटील उपस्थित होते. 

सत्ताबदलानंतरच्या महामंडळ सभेला महत्त्व 
राज्यात पाच वर्षानंतर सत्तांतर झाले आहे. त्या सत्तांतरामुळे यंदाच्या होणाऱ्या महामंडळ सभेस विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षक व खासदार शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे पवार यांच्याकडे काहीतरी ठोस मागणी करून ती पदरात पाडून घेण्याच्यादृष्टीने शिक्षक संघाने तयारी सुरू केली आहे. त्याला कितपत यश येते हे 19 जानेवारीला निश्‍चित होणार आहे. 

महाराष्ट्र 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com