esakal | शिवणकाम करणाऱ्या राणी सईबाई महिला संघाच्या सदस्या
sakal

बोलून बातमी शोधा

belgaum

Belgaum : शिवणकाम करणाऱ्या राणी सईबाई महिला संघाच्या सदस्या

sakal_logo
By
तानाजी बिरनाळे

कारदगा : सध्या प्रत्येक महिलेने चूल आणि मूल या भोवतीच गुरफटून न राहता स्वावलंबी बनावे, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी कारदगा (ता. निपाणी) येथील राणी सईबाई संघाने महिला स्वावलंबना बरोबर सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. त्यांची खासियत अशी की, कोरोना महामारीच्या बिकट काळातही १०० महिलांच्या हाताला काम व पाठबळ देऊन ग्रामीण भागात एक आदर्श निर्माण केला आहे.

कारदगा येथील माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 महिलांनी एकत्रित येऊन 2006 साली राणी सईबाई महिला स्वसहाय्य संघाची स्थापना केली. संघामार्फत प्रत्येक महिलेला त्यांच्या पायावर उभे राहून सक्षम करण्यासाठी बचत गटाची निर्मिती केली. पंधरा वर्षापासून बचत गटाची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

गेल्या दोन वर्षांपासून देशभर कोरोनाजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण उद्योग व व्यवसाय थंड होते. अशा काळातही प्रत्येक महिलांच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने बचत गटाच्या माध्यमातून 100 हून अधिक महिलांना मास्क शिवण्याचे काम उपलब्ध करून दिले. परिणामी एेन कोरोना काळात महिलांच्या हाताला काम मिळाले. त्यातून लाखोंची उलाढाल झाली आहे.

संघामार्फत दरमहा प्रत्येक महिलेकडून पन्नास रुपये याप्रमाणे बचत करून वर्षाला लाखोची उलाढाल सुरू आहे. गरजू महिलांच्या आर्थिक अडचणी त्यातून दूर करण्यात येत आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणासारखे उपक्रम राबविण्यात आले आहेत. याशिवाय व्याख्यान, हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांचे प्रबोधन केले जाते. येत्या काळातही कारदगासह परिसरातील प्रत्येक महिला स्वावलंबी होण्यासाठी राणी सईबाई महिला संघ प्रेरणा देत आहे.

हेही वाचा: निवडणूक शपथपत्र : फडणवीसांविरोधात तक्रार, साक्ष नोंदणी प्रक्रिया सुरू

कारदगासारख्या ग्रामीण भागात पंधरा वर्षापूर्वी राणी सईबाई महिला संघाची स्थापना केली. त्यामार्फत महिलांना स्वावलंबनाबरोबर आर्थिक प्रगती साधण्यासाठी पाठबळ देण्यात येत आहे. या संघाबरोबर इतर 10 संघामार्फतही विविध उपक्रम राबविले जातात.

-सुमित्रा उगळे,

अध्यक्षा, राणी सईबाई महिला संघ, कारदगा

loading image
go to top