व्यापाऱ्याची सुरूवात आता राष्ट्रगिताने; भिलवडीत व्यापारी संघटनेचा निर्णय 

सतीश तोडकर 
Tuesday, 18 August 2020

स्वातंत्र्यदिनी सकाळी नऊ वाजता राष्ट्रगीताने या ध्वनीव्यवस्थेची सुरुवात झाली. 

भिलवडी (सांगली) : देशाला अभिवादन करून येथील व्यापारी संघटना आपल्या कामाची सुरुवात करणार आहे. नुकत्याच स्थापन झालेल्या भिलवडी व्यापारी संघटनेने हा उपक्रम सुरू केला आहे . त्याचे उद्‌घाटन संघटना अध्यक्ष रमेश पाटील यांच्याहस्ते झाले . यासाठी संपूर्ण भिलवडी गावाला ऐकू जाईल अशी कायमस्वरूपी ध्वनीव्यवस्था सुरु केली आहे. स्वातंत्र्यदिनी सकाळी नऊ वाजता राष्ट्रगीताने या ध्वनीव्यवस्थेची सुरुवात झाली. 

व्यापारी संघटनेच्या नूतन कार्यकारिणी फलकाचे उद्योजक गिरीश चितळे, सरपंच विजयकुमार चोपडे, माजी सरपंच धनंजय पाटील यांनी केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी तनया चौगुले, सिद्धी साळुंखे, समृद्धी सुरवसे, पूर्वा कुलकर्णी, हर्ष पाटील, पृथ्वीराज पाटील, मयुरी माने, वैष्णवी पाटील, साक्षी जाधव, रोहित जाधव, प्रज्ञा भोसले, विश्वजा पाटील, समीक्षा वायदंडे, गतवर्षीच्या महापुरामध्ये उल्लेखनीय काम करणारे महावितरण कर्मचारी सुखदेव पाटील, राहुल निकम, केशव चव्हाण यांचा सत्कार झाला. 

यावेळी सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब मोहिते, संभाजी सुर्यवंशी, तानाजी भोई, संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप कोरे, रणजित पाटील, सचिव महेश शेटे, सहसचिव विजय शिंदे, खजिनदार दिलावर तांबोळी, कार्याध्यक्ष जावेद तांबोळी, पत्रकार प्रतिनिधी घनशाम मोरे, समीर कुलकर्णी व व्यापारी उपस्थित होते. अध्यक्ष रमेश पाटील यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी सुत्रसंचालन केले महेश शेटे यांनी आभार मानले. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The merchant begins now with the national anthem; Decision of Bhilwadi Chamber of Commerce