
किल्लेमच्छिंद्रगड : उन्हाळा हा दूध व्यवसायाचा कृषकाळ. ऑक्टोंबर महिन्याच्या पृष्ठ काळाच्या तुलनेत उन्हाळ्यात दुध संकलन घटून चाळीस टक्क्यावर येते. मागणी आणि पुरवठा याचे गणीत जुळत नाही. नेमक्या याच संधीचा फायदा घेवून खासगी व्यवसाय करणारे शासनाने ठरवून दिलेल्या दरामध्ये दुध संकलन करणाऱ्या संस्थांना दिले जाणारे वाहतूक कमीशन तसेच दिवाळीसाठी दिल्या जाणाऱ्या बोनसचा समावेश करून प्रतिलिटर तीन ते चार रुपये जादा दर देत असल्याचे भासवून सोशल मिडीयाद्वारे दुध उपादकांची दिशाभूल करीत असल्याचे दिसून येत आहे.