esakal | इस्लामपुरला दूध बंद आंदोलनाचा भडका 
sakal

बोलून बातमी शोधा

IMG-20200801-WA0068.jpg

इस्लामपूर : दुधाला दर मिळावा यासाठी पुकारण्यात आलेल्या दूध दर आंदोलनाला इस्लामपुरात आज हिंसक वळण लागले. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी पेठ- सांगली रस्त्यावर येथील बसस्थानक परिसरात ठिय्या मारून म्हणून भजन गात सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

इस्लामपुरला दूध बंद आंदोलनाचा भडका 

sakal_logo
By
शांताराम पाटील

इस्लामपूर : दुधाला दर मिळावा यासाठी पुकारण्यात आलेल्या दूध दर आंदोलनाला इस्लामपुरात आज हिंसक वळण लागले. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी पेठ- सांगली रस्त्यावर येथील बसस्थानक परिसरात ठिय्या मारून म्हणून भजन गात सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

भाजपसह त्यांच्या सहयोगी संघटनांनी आज दूध दरासाठी आंदोलनाची घोषणा केली होती. इस्लामपूर येथे रयत क्रांतींच्या आंदोलनावेळी संघटनेचे सागर खोत यांना पोलिसांनी अटक केली. आटपाडी तालुक्‍यातील झरे येथे आमदार गोपीचंद पडळकर तसेच शिराळा येथेही आंदोलन केले. 

आंदोलन स्थळापासून दूध वाहतूक करणारा टेम्पो दूध घेऊन जाताना त्यांच्या समोर आला. आक्रमक कार्यकर्त्यांनी भजनाचा नाद सोडून घोषणाबाजी सुरू करत टेम्पो अडवून कॅनमधील दूध रस्त्यावर ओतले.

पोलिसांचा हस्तक्षेप न जुमानता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूध टेम्पो मधील कॅन खाली उतरत रस्त्यावर दूध ओतले. जोरदार घोषणाबाजी केली काही वेळातच पोलिसांनी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र सागर खोत व त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली. 

संपादन ः अमोल गुरव