esakal | सांगलीत मिनी लॉकडाऊनचा फज्जा; शासनाचे आदेश धाब्यावर, बाजारपेठ सुरू

बोलून बातमी शोधा

mini lockdown not run properly by sangli people in market open

मात्र व्यापाऱ्यांनी शासनाचे आदेश झुगारुन देत बाजारपेठ सुरुच ठेवली. तसेच भाजी विक्रेतेही रस्त्यावरच बसल्याने बाजारात गर्दी होती.

सांगलीत मिनी लॉकडाऊनचा फज्जा; शासनाचे आदेश धाब्यावर, बाजारपेठ सुरू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : शासनाने कोरोनाला रोखण्यासाठी आजपासून मिनी लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. मात्र व्यापाऱ्यांनी शासनाचे आदेश झुगारुन देत बाजारपेठ सुरुच ठेवली. तसेच भाजी विक्रेतेही रस्त्यावरच बसल्याने बाजारात गर्दी होती. त्यामुळे आज दुपारपर्यंत तरी या मिनी लॉकडाऊनचा फज्जा उडाला होता. 

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने शासनाने आजपासून राज्यभरात मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामध्ये अत्यावश्‍यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ, मॉल, जिम, चित्रपटगृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु झाली आहे. परंतू आज सकाळपासूनच शहरातील बाजारपेठ सुरु होत्या. लॉकडाऊनचा प्रभाव दिसत नव्हता. 

हेही वाचा -  शेतकऱ्यांसाठी Good News: आता आटपाडीत होणार कांदा खरेदी  मार्केट

आधी महापूर आणि नंतर कोरोनाने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच पुन्हा सणासुदीच्या काळात व्यापार बंद ठेवून नुकसान करुन घेण्यास व्यापाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे व्यापारी संघटनांनी या लॉकडाऊनला विरोध करत दुकाने सुरु ठेवण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. त्याचाच प्रभाव दिसून आला. मारुती रोड, गणपती पेठ, मेन रोड, सराफ कट्‌टा या भागात तसेच विश्रामबाग परिसरातही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरुच ठेवल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे दुपारपर्यंतचे चित्र लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे दिसत होते.