Mohol AccidentSakal
पश्चिम महाराष्ट्र
Mohol Accident : मिनीबस, कंटेनर व मोटरसायकल या तिहेरी वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू , अन्य 15 जण जखमी
Accident On Solapur Pune Highway : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ शहराजवळ झालेल्या तिहेरी अपघातात एक व्यक्ती मृत्यूमुखी पडली, तर १५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ११ जणांना खाजगी रुग्णालयात आणि ४ जणांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मोहोळ : मिनीबस, कंटेनर व मोटरसायकल या तिहेरी वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर अन्य 15 जण जखमी झाले. जखमी पैकी 11 जणांवर मोहोळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अन्य चार जणांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा अपघात सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोळेगाव फाट्यावर दुपारी अडीच वाजता झाला. या अपघाता मुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

