'माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’

- चंद्रकांत पाटील 

इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री चंद्रकांत पाटील  यांनी केले

रेठरे बुद्रुक येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, कृष्णाचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, विनायक भोसले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास  महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार शंभूराजे देसाई, शिवाजीराव नाईक, पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिलीप येळगावकर, नीता केळकर, मदन मोहिते, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सम्राट महाडिक प्रमुख उपस्थित होते. 

डॉ. सुरेश भोसले म्हणाले,‘‘कृष्णा कारखान्याने ५० वर्षांतील उच्चांकी दर दिला. सहकारी कारखानदारीसाठी आवश्‍यक असलेले सर्व प्रकल्प राबवलेत.’’ 

डॉ. अतुल भोसले म्हणाले,‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठीवर हात ठेवल्यामुळे कारखान्याला परत सुवर्णकाळ येईल.’’ 
उपाध्यक्ष जगदीश जगताप यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Chandrakant Patil comment