सांगली : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठली असताना पर्यटन तथा खणिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी पाठराखण केली आहे. सरनाईक यांचा मराठीला वेगळे बोलण्याचा उद्देश नसल्याचे मंत्री देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत हल्लाबोल केला. राऊत यांना काड्या टाकण्याची सवय असून, तीन वर्षांपासून ते महायुतीत काडी टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही मंत्री देसाई यांनी केली.