बेळगाव : महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) व त्यांचे बंधू विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या मोटारीचा पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग (Pune-Bangalore National Highway) कित्तूरजवळ (ता. १३) पहाटे पाचच्या सुमारास अपघात झाला. कित्तूर तालुक्यात अंबडगट्टीनजीक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला त्यांच्या मोटारीने धडक दिली. यामुळे मोटारीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.