
आरग : ‘‘येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि स्मारक बांधणीचे काम जवळपास पूर्ण झाले. स्मारकाचे उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. स्मारकाचा लोकार्पण सोहळा लवकरच घेतला जाईल,’’ अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी आरग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि स्मारकाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश खाडे यांनी स्मारक बांधकामाची माहिती दिली.